Skip to content

श्री शंकर आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्य सुन्दर मस्तकी वाळा
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा

जय देव जय देव जय श्री शंकरा
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा जय देव

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा
विभुतीचे उधळण शितकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा
जय देव

देवी दैत्य सागर मंथन पै केले
त्यामाजी अवचीत हलहल जे उठले
ते त्वा असुरपणे प्राशन केले
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले
जय देव

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी
रघुकुळटीळक् रामदासा अंतरी
जय देव

— समर्थ रामदासस्वामी