Skip to content

रामाची आरती

ओवाळा ओवाळा राघव शरयू तिरवाशी
मनजोती पंचारती उजळू राघव गुणराशी
ओवाळा ओवाळा राघव

सन्मुख उभा कर जोडूनी सेवक हनुमंत
शत्रुघ्न वरी चावर ढाळी व्यंजन भरत
ओवाळा ओवाळा राघव

वामांगी कमलालय सुंदर जनकाची बाला
कौसल्या सुमित्रा आरती घेऊन वेल्हाळा
ओवाळा ओवाळा राघव

शक्ररारी हरि दक्षिणभागी कारमुक शरपाणी
विश्वंभर करी रुद्र कृपालय राघव गुणवानी
ओवाळा ओवाळा राघव