Skip to content

महालक्ष्मीची आरती

दुर्गे दुर्गट भारी तुजविण संसारी
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणाते वारी
हारी पडलो आता संकट निवारी
जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी
दैत्या सुर मर्दिनी
जय देवी जय देवी

त्रिभुवनी भूवनी पाहता तुझं ऐसी नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे काही आरती
साही विवाद करिता पडलो प्रवाही
ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी
पावसि लवलाही
जय देवी जय देवी

प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा
क्लेशापासुन सोडी दुःखापासून सोडी
तोडी भवपाशा अंबे तुज वाचून
कोण पुरविल आशा
नरहर तल्लीन झाला पंकज लेशा
जय देवी जय देवी