श्री सद्गुरुंची आरती
सगुण हे आरती निर्गुण ओंवाळूं
निर्गुण ओंवाळूं
कल्पनेचें घृत घालूं दीप पाजळूं
ओंवाळूं आरती सद्गुरुनाथा श्रीगुरुनाथा
भावें चरणकमळावरी ठेविला माथा
अविद्येचा मोह पडला उपडोनी सांडूं
उपडोनी सांडूं
आशा मनशा तृष्णा काम क्रोध कुरवंडू
सद्गुरूचे पूजन केले षोडशोपचारे
केले षोडशोपचारे
रामानंद जीवन्मुक्त झाला संसारी