Skip to content

गणपतीची आरती

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके मुक्ता फळाची
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव

रत्न खचित फरा तुझं गौरी कुमरा
चंदनाची उटी कुंकुम केशरा
हिरे जडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया
जयदेव जयदेव

लंबोदर पितांबर फणीवर वंदना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दासरामाचा वाट पाहे सदना
संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना
जयदेव जयदेव