देवीची आरती
जय देवी विष्णुकांते महालक्ष्मी माते
आरती ओवाळीन तुझं विज्ञान सरिते
जय देवी विष्णुकांते
मर्दिला कोल्हापूर ख्याती केलीस थोर
श्री लक्ष्मी नाव तुझे दैत्य कापती फार
जय देवी विष्णुकांते
रहिवास कोल्हापुरी पंचगंगेच्या तिरी
तू विशाल सिंहासन विराजशी तयावरी
जय देवी विष्णुकांते
धन्य ते कोल्हापूर धन्य तेथीची नर
सकळही मुक्त होती तुला पाहता सत्वर
जय देवी विष्णुकांते
मागणे हेची माय आता दाखवी पाय
उशीर नको लावू दास तुझा वाट पाहे
जय देवी विष्णुकांते